साध्वी चंफा माता परिसर दुमदुमला गणरायाच्या जयघोषाने!

स्टार भारत भारत लाईव्ह
एक्सप्रेस तेल्हारा प्रतिनिधी
संतोष गिऱ्हे
चंफा माता गणेशोत्सव मंडळाची भव्य महाआरती; भजन-आरतीने भक्तिमय वातावरण, शेकडो भाविकांचा महाप्रसादाला प्रतिसाद
माळेगाव : येथील वीर भगतसिंग गणेश उत्सव मंडळाच्या वतीने माळेगाव परिसरात गणरायाची भव्य महाआरती उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून जपली जात असलेली महाआरतीची परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात कायम ठेवण्यात आली. महाआरतीसाठी शेकडो भाविकांनी उपस्थिती लावत गणरायाचे दर्शन, चंफा माता चे सुद्धा दर्शन घेतले.
महाआरतीला गावातील नागरिक यांची उपस्थिती होते . यावेळी गावातील सर्व मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष,उपाध्यक्ष,उपस्थित होते.
यावेळी गावातील भजन मंडळ साप्ताहिक आरती मंडळ व भजन मंडळाने आरतीचे सादरीकरण केले. भजन मंडळाच्या सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. महाआरतीच्या वेळी घुमलेल्या आरतीच्या गजराने चंफा माता गणेशोत्सव मंडळ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भाविकांनी मोठ्या उत्साहाने महाआरतीत सहभाग घेतला.
महाआरती नंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक उत्साहासोबतच कार्यक्रमात सामाजिक एकोपा, सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, यांच्या वतीने करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, परंपरा आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळेगाव बाजारचे ग्रामदैवत साध्वी चंफा माता मंदिर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजन आणि सहकार्यामुळे महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला.



