महाराष्ट्रसामाजिक

सांगवी येथील 84 खेडी योजनेचे पाणी टाकी द्वारे न दिल्यास आमरण उपोषण; उपसरपंच सौ जिजाबाई बोर्डे यांचा ईशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस-व्हि एम घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी दि.१०

तेल्हारा तालुक्यातील पिवदळ खु गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या

सांगवी हिवरे येथे 84 खेडी योजनेचे पाणी टाकी द्वारे देण्याची मागणी उपसरपंच सौ जिजाबाई जयकुमार बोर्डे यांनी जिवन प्राधिकरण विभाग आकोट यांच्या कडे केली असुन तसे न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे
त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 84 खेडी योजनेचे पाणी टाकी द्वारे दिले तर ते संपुर्ण गावाला मिळेल आजपर्यंत म्हणजे 10 वर्ष झाले ते पाणी संपूर्ण गावाला मिळत होते पण महाराष्ट्र शासनाने काढलेली योजना घर घर पाणी पाणी या योजनेतुन प्रत्येक गावात पाईप लाईन टाकणे चालु आहे पण आमच्या सांगवी हिवरे गावात जी पाईप लाईन टाकणे चालू होती ती चुकीच्या माध्यमातून टाकणे चालू होती त्यांची सविस्तर पाहणी जिवन प्राधिकरण विभाग आकोट च्या अधिकाऱ्यांकडून केली त्यांना योग्य न वाटल्याने त्यांनी त्याला स्थगित दिली पण गावातील उंचावरील घरे व गावातील खोलगट भागातील राहणारे अशी गावात विभागणी झालेली आहे त्यामुळे गावात या पाण्याच्या वादामुळे उंचावरील व खोलगट भागात राहणाऱ्या मध्ये वाद विवाद हाणामारी होवु शकते त्यासाठी जिवन प्राधिकरण विभागाने टेक्निकल इंजिनिअर पाठवुन पाईप लाईन टाकण्यात यावी पण कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप न करता ती पाईप लाईन टाकण्यात यावी अशी मागणी वजा विनंती सांगवी हिवरे गावच्या उपसरपंच सौ जिजाबाई जयकुमार बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी असे म्हटले की अशुद्ध पाणी मिळत असल्याबाबतची तक्रार असली तरी नवीन पाईप लाईन टाकण्याचा जो खटाटोप सुरू आहे त्यापेक्षा जी पाईप लाईन लिकेज आहे ते लिकेज काढून अशुद्ध पाण्याचा नायनाट होवु शकतो वरुन पाईप लाईन देण्याचे कारण असे आहे की ज्या खोलगटावरुन उंच भागात पाणी पोहोचले नाही तर त्या पाईप लाईन चा उपयोग काय? असा प्रश्न करुन यांची जिवन प्राधिकरण विभाग आकोट ने दखल न घेतल्यास आम्हाला आमरण उपोषण करावे लागणार असल्याचे सांगवी हिवरे गावच्या उपसरपंच
सौ जिजाबाई जयकुमार बोर्डे यांनी केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button