गुन्हेगारीजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भालोद गाव खुनाने हादरले!

तरुणाची दगडाने ठेचून हत्या; मित्रांमध्ये झालेल्या वादातून रक्तरंजित घटना

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात; एकाचा शोध सुरू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा
भालोद, ता. यावल | जळगाव
प्रतिनिधी विनोद तायडे

यावल तालुक्यातील भालोद गावात तरुणाच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची माहिती फैजपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रथम खबर अहवालातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती एफआयआरमध्ये नमूद आहे.

एफआयआरनुसार, घटना 20 सप्टेंबरच्या रात्रीपासून 21 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत भालोद परिसरातील पाटला मळा भागात घडली. तक्रारदाराच्या कथनानुसार, मृत तरुण रमेश डोंगरसिंग भावर याच्यासोबत संबंधित व्यक्तींचा वाद झाला होता.

तक्रारीनुसार, रमेश याच्यावर दगडाने मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर त्याचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला.

मृतदेह आढळताच परिसरात खळबळ

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी केली. या घटनेमुळे भालोद परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

एफआयआरमध्ये संजय सतीश कोळी, सुरज वासुदेव कोळी आणि सुरज प्रभात नेमाडे उर्फ गोलू यांची आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे.

फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0194/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 103(1), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक विनोद वसंत गभाणे यांच्याकडे देण्यात आहे.

नेमका वाद कशामुळे? तपासातून उलगडणार

मित्रांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर हत्या कशी घडली, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेतील प्रत्येक बाब, आरोपींची भूमिका, वापरलेले हत्यार व घटनेचा नेमका क्रम याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणातील सर्व तथ्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट होणार आहे.

गावातील तरुणांमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत कसे झाले? या घटनेमागील संपूर्ण सत्य तपासातून समोर येणे गरजेचे आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button