बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशेती

सलग तिसऱ्यांदा शेतकऱ्यांवर आसमानी संकट

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट पातूर तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान शेतकरी संकटातपातूर :तहसील अंतर्गत असलेल्या तुलंगा खुर्द सस्ती दिग्रस खुर्द बु, बेलुरा तांदळी आदि गावात शुक्रवार ७ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास वादळवारासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असता गारपीट मोठ्या प्रमाणात पडून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पुन्हा एकदा नवीन संकटला सामोरे जावे लागत असल्याने चित्र पाहायला मिळालेला आहे .मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस बुद्रुक दिग्रस खुर्द तांदळी हिंगणा बाबुळगाव, बेलुरा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट सह अवकाळी पावसाची दमदार हजेरी झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसानन झालेले आहे. आंब्याच्या कैऱ्या, आंब्याचे झाड उन्मळून खाली पडले तर त्यामुळे ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण झाली आहे या तुलंगा बुद्रुक परिसरामध्ये गारपीट ने कांदा पिकाचे नुकसान झाले तर दिग्रस बुद्रुक येथे काहीच्या घरावरील टिन उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच बेलुरा येथील शशिकांत डांगे यांच्या शेतातील लिंबू मुळासकट उन्मळून पडले आहे कांद्याचे बी सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब झाले.काहींच्या शेतात वाहते पाणी झाले असल्याने काही वेळ रस्ता बंद झाला होता या सर्व गावामधील मधील तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी प्रसेनजीत रोकडे,विनय दाभाडे, गोविद पाटील, बाजीराव ताले, रवी महल्ले, भिकाजी इंगळे, यशवंत इंगळे, प्रवीण अंभोरे, अशोक इंगळे, दुतोंडे,आदी गावकऱ्यांनी व ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली आहेदिग्रस बु परिसरात अवकाळी पावसाने अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्याचा कांदा पीक गारपीट ने जमीनदोस्त झाला आहे.या भागातील सर्व्हे करून तत्काळदत्त द्यावी..रवी महल्ले दिग्रस खुर्दशेतकरी बेलुरा परिसरात वादळ वादळ वाऱ्यासह अनेकांच्या शेतातील लिंबू झाडे उनमूलन खाली पडले त्यामुळे काय करावे हा प्रश्न निर्माण झालागणेश दुतोंडे ,शेतकरी बेलुराअकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या मध्ये गरपीट, पाऊस, हवा ह्यामुळे कांदा, लिंबू, संत्रा गहू, बियाचा कांदा, ज्वारी आदी पिकांचे प्रचंड नुकसान,झाले अनेक घरांचे पत्रे उडून गेलेत. जनावरांचे सुद्धा नुकसान झाले आहे . तांदळी बु, तांदळी खु, हिंगणा, बेलूरा बु, बेलूरा खु, तुलंगा बु., तुलंगा खुर्द, सांगोळा, दिग्रस बु, दिग्रस खु, लावखेड,बेलूरा येथील नदी नाल्याना पूर.पातूर चे तहसीलदार दीपक बाजड ह्यांच्याशी संपर्क केला असून तात्काळ पंचनामे करण्याची विनंती केली. महाराष्ट्र चे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,तसेच राज्याचे विरोधी पक्षनेता मा अजितदादा पवार, मा महसूल मंत्री, तथा मदत व पुनर्वसन मंत्री ह्यांनाही कळवण्यात आले आहे.तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी विनंती कृष्णा अंधारे ह्यांनी केली आहे. कृष्णा अंधारेप्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button