क्राईममहाराष्ट्रविदर्भ

चाकू हल्यात युवकाच्या मृत्यू प्रकरणी तिघांना अटक

पातुर तालुका प्रतिनिधी

सुखलाल उपर्वट

चान्नी पोलिस स्टेशनअंतर्गत आलेगाव येथे धारदार शस्त्राने जीवघेण्या हल्ला केल्यानंतर जखमी युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आरोपी महादेव धात्रक, गणेश धात्रक, दीपक धात्रक, या तिघे आरोपींना अटक केली असून, तिघांना गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी मा न्यायालयात हजर केले असता . न्यायालयाने तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास योगेश वाघमारे चान्नी हे करत आहेत.

आलेगाव येथे छ शिवाजी चौकात तीन जणांनी दोघा सख्ख्या भावांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना २९ मार्च रोजी घडली होती. यात चेतन काळदाते, दीपक काळदाते हे दोघे भाऊ
गंभीर झाल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू असताना चेतन काळदाते याचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाल्याने पोलिसांनी आरोपी महादेव धात्रक, गणेश धात्रक, दीपक धात्रक, यांच्याविरुद्ध गुन्ह्यात वाढ करून जीवघेणा हल्ल्यासह हत्येचा गुन्हा दाखल केला होता. अखेर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी सूत्रे हातात घेत त्यांच्या टीम सह आरोपींचा शोध घेत अटक केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button