बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

समाधान सुपेकर यांनी स्वीकारला कृ. उ. बाजार समिती चिखलीचा पदभार

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

समाधान सुपेकर 24 तास शेतकऱ्याच्या सुख दुःखात धावून जाणारे नेतृत्व :- राहुल भाऊ बोंद्रे

     ऊन असो,पाऊस असो… रात्र असेल दिवस असेल, स्वतःचं वाहन असेल,नसेल… तरी एसटी ने प्रवास करुन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी, जन सामान्य माणसाच्या सुख दुःखा मध्ये धावून जाणारे ,24 तास उपलब्ध असलेले… जनसामान्य माणसाला आपलसं वाटावे असे समाधान सुपेकर हे जनसामान्य माणसाचे चालते फिरते विद्यापीठ वाटते‌ असे प्रतिपादन माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी केले.
   
    चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली चा सभापती पदाचा पदभार सोहळा मा.आ.राहुल भाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

   नेतृत्व संकटात असताना समाधान भाऊ सुपेकर यांनी आपला पदाचा पदभार स्वीकारला नाही. असे इमानदर, निःस्वार्थी कार्यकर्ते नेत्याला खूप कमी भेटतात, परंतु राहुल भाऊ बोंद्रे यांना समाधान सुपेकर यांच्या माध्यमातून इमानदार सहकारी कार्यकर्ता मिळाला हे राहुल भाऊ चे भाग्यचं… अशी प्रतिपादन नरेंद्र भाऊ खेडेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

    या पदभार सोहळ्याला तालुक्याभरातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी संघटनेचे नेते व बाजार समितीचे संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते.

     महाविकास आघाडीचे नेते नरेंद्र भाऊ खेडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, प्रकाश पाटील, एकनाथ पाटील थुट्टे,डॉ.सौ. ज्योतीताई खेडेकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दासां पाटील, उपसभापती किसनराव धोंडगे,राम भाऊ जाधव,काशिनाथ अप्पा बोंद्रे, दिपक देशमाने, डॉ.इसरार,विजय शेजुळ,भाई प्रदिप अंभोरे, गजानन वायाळ ,दिपक म्हस्के, संतोष वाकडे, मनोज भुतेकर,बाळु पवार, गणेशराव ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button