
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस: प्रतिनिधी
लाडक्या बहिणींवर पुन्हा चुल पेटवण्याची वेळ, हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन ? : राहुलभाऊ बोंद्रे
चिखली : मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अचानक ६० रुपये अशी वाढ करून सर्वसामान्य जनतेकडून पठाणी लूट सुरु केली आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने आजवर किमान ५० वेळा गॅस सिंलेडरच्या दरात वाढ केली आहे. काँग्रेसच्या काळात ४०० रूपयांवर असलेला गॅस सिलेंडर आता ९०० रूपयांवर पोहोचला आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरही गेल्या आठवडाभरात १५० रूपयांनी महाग झाल्याने त्याची किंमतही १ हजार ९०० च्या जवळपास पोहोचली आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहिण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट देण्याचा सरकारचा दुपट्टीपणा समोर आला आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडले असून लाडक्या बहिणींवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे, हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन ? असा संतप्त सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी केला आहे.
केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने केलेल्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध तसेच निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवार 12 मार्च रोजी चिखली तालुका व काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तद्नंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडरच्या वाढीव दराचा निषेध करत गॅसच्या तिरडी आंदोलनाने तहसील परिसर दणाणून सोडला. निवेदन घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयाबाहेर न आल्याने काँग्रेस पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
सर्वसामान्यांच्या समस्या ऐकायला सुध्दा सरकार तयार नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. तद्नंतर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….✍🏻



