महाराष्ट्रसामाजिक

शुक्लेश्वर मंदिराच्या बांधकामास श्री प्रसाद महाराज अमळनेरकर यांची सदिच्छा भेट

. राहुरी प्रतिनिधी दत्ताजी जोगदंड
खांदेशातील संत सखाराम महाराज (अमळनेर) ही राज्यातील प्रमुख दिंडींपैकी आहे. आषाढी वारीला दिंडी अमळनेर येथून पंढरपूरला जाते. चार्तुमासात दिंडीचे वास्तव्य पंढरपूर येथे असते. कार्तिकी वारीला दिंडी पंढरपूर येथुन अंमळनेरला माघारी निघते. वर्षातील आठ महिने दिंडीची फिरस्ती असते. शेकडो वर्षांची दिंडीची ही परंपरा आहे. सदगुरू प्रसाद महाराज हे या गादीवरील ११ वे सत्पुरूष आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथून परतीचे प्रवासादरम्यान राहुरीतील अतिशय प्राचीन अशा श्री शुकलेश्वर मंदिराचे बांधकामास महाराजांनी भेट दिली. विशेष बाब म्हणजे याच दिवशी मदिर गाभाऱ्याचा दरवाजा बसविण्यात आला. महाराजांचे हाताने दरवाजाची पूजा करण्यात आली. त्यावेळी महाराजांनी काही मार्गदर्शक सूचना केल्या व मंदिरासाठी रक्कम रू 5100/- आणि मंदिरासाठी कळस देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर हे देखील तितक्याच ठामपणे सांगितले की, मंदिरासाठी मी कळस देणार म्हटल्यावर मंदिर लवकरच पूर्णत्वास येणार. यावेळी महाराजांना मदिराचे मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयास उपस्थित रहाणेविषयी आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले तेही त्यांनी आनंदाने स्विकारले.
जय भोलेनाथ! तेरी लिला अपरंपार!!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button