Uncategorized

डोंगरकिन्ही येथे बसचा थांबा न दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

माननीय विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांना पण दिले निवेदन

वाशिम (अजय गायकवाड )

मालेगाव : दिनांक 11 जाने 2025 डोंगरकिन्ही हे गाव मालेगाव -मेहकर -जालना महामार्गावर आहे. या गावाची लोकसंख्या बहुतांश 5000 इतकी आहे. येथील विद्यार्थी केनवड मालेगाव मेहकर वाशिम इत्यादी ठिकाणी शिक्षणासाठी जातात. तसेच ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला व इतर ग्रामस्थ पण नियमित डोंगरकिन्ही येथून अकोला, वाशिम,बुलढाणा,हिंगोली,आदि शहराच्या ठिकाणी कामानिमित्त प्रवास करीत असतात. परंतु डोंगरकिन्ही गावामध्ये राज्य परिवहन महामंडळ ची कोणतीच बस थांबत नसल्यामुळे,विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक,महिला व इतर ग्रामस्थ यांची गैरसोय होत असल्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त समिती तथा डोंगर किन्ही गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मे.आगार व्यवस्थापक राज्य महामार्ग परिवहन महामंडळ वाशिम, अकोला,मेहकर यांना निवेदनाद्वारे विनंतीपूर्वक मेहकर मालेगाव या मार्गाने नियमित जाणाऱ्या सर्व बसचा थांबा डोंगर किन्ही येथे देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
तसेच निवेदनामध्ये 31/01/2025 पर्यंत बसचा थांबा मंजूर करण्यात यावे अशी मागणी डोंगरकिन्ही गाव तंटामुक्त समितीतथा समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आली.व तसेच असे न झाल्यास 01/02/ 2025 रोजी मालेगाव -मेहकर या राज्य महामार्गावर डोंगर किन्ही गाव तंटामुक्त समिती व ग्रामस्थ यांच्याकडून रास्ता रोको करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला.तसेच
डोंगरकिन्ही येथे एसटी बस थांबा मिळविण्याकरिता माननीय विधानपरिषद आमदार भावनाताई गवळी यांना पण निवेदन देण्यात आले.निवेदन करते डोंगरकिन्ही गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष सेवा रामजी आडे व सुनील देशमुख डोंगरकिन्ही मा सरपंच व राजूभाऊ सोमानी व किसनराव देशमुख तसेच राजू शेषराव देशमुख संजीव सोमानी व ग्रामपंचायतच्या ठरावासहित
गावातील इतर 700 ग्रामस्थाच्या सह्या आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button