बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी (PM RELIEF FUND) अंतर्गत बुलडाणा जिल्हयातील 49 रुग्णांना 1 कोटी 20 लाख 66 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य… !

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस दै.आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी अरुणा दत्तात्रय खंडागळे

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आला पाठपुरावा…!!

बुलडाणा

प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत बुलडाणा जिल्हयातील 49 रुग्णांना 1 कोटी 20 लाख 66 हजार रुपयांचे आर्थिक मदत आरोग्य उपचारासाठी देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री  तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून या संदर्भात पाठपूरावा करण्यात आला होता.

असाध्य उपचारासाठी रुग्णांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत (PM RELIEF FUND) सन 2024 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत रुग्णांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रताप राव जाधव यांच्या खासदार सुविधा केंद्र आणि वैदयकिय मदत कक्षाकडे ह्दय शस्त्रक्रिया, मुत्रपिंठ प्रत्यारोपण,कर्करोग उपचारासाठी मदत मागण्यात आली होती. या रुग्णांच्या उपचाराकरीता प्रधानमंत्री राष्ट्रीय निधी मिळण्यासंदर्भात पाठपुरावा  करण्यात आला होता. या पाठपुराव्याला चांगले यश मिळाले असुन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या 73 पैकी 49 रुग्णांना पी.एम. रिलीफ फंड अंतर्गत 1 कोटी 20 लाख 66 हजार रुपयाची आर्थिक मदत संबंधित दवाखान्यामध्ये उपचाराकरीता वर्ग करण्यात आली आहे. तर 21 रुग्णांचे प्रकरणे प्रक्रियेत आहेत. तर केवळ 3 प्रकरणे रद्द झाले आहे.

पंतप्रधान रिलीफ फंड योजनेअंतर्गत बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील रुग्णांना अर्थ सहाय्य उपलब्ध रुग्णांना जीवदान देण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव  यांच्या कार्यालयाच्या वतीने रुग्णांना पी.एम.रिलीफ फंड मिळवून देण्यासाठी मदत केल्या जात आहे त्यामुळेच मोठया प्रमाणात जिल्हयातील नागरिंकाना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button