विदर्भसामाजिक

तेल्हारा शहरात विकसित भारत संकल्‍प यात्रा कार्यक्रम संपन्न !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.१७; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व मॉं जिजाऊ न.प. उद्यान तेल्हारा येथे
विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम मंगळवार दि.१७ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला. देशामध्ये केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएमस्वनिधी), प्रधानमन्त्री आवास योजना (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी). प्रधानमंत्री ई-बस सेवा व अमृत योजना, आयुष्‍यमान भारत, उज्‍वला, आधार इ. योजना राबविल्या जातात. या प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परीपूर्णता साध्य करण्यासाठी दि. १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ चे आयोजन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार होत आहे.
त्‍यानुषंगाने तेल्हारा नगर परिषद क्षेत्रामध्‍ये दिनांक १७.०१.२०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर , मॉं जिजाऊ उद्यान शेगाव नाका समोर तेल्हारा येथे सकाळी ११:०० वाजता विकसित भारत संकल्‍प यात्रेचे आयोजन श्री सतीश गावंडे मुख्याधिकारी तेल्हारा नगर परिषद यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला असून या कार्यक्रमाला श्री सुरज गोळे साहेब, श्री प्रकाश वैध नोडल अधिकारी आकाशवाणी अकोला यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी मा.नगर सेवक सुनील राठोड, ओम सुईवाल, सोळंके भाऊ यांची उपस्थिती लाभली. सर्व प्रथम विकसित संकल्प यात्रा गाडीचे फीत कापून कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करण्यात आली . तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरांनी सन २०२४ चे दिनदर्शिका ,बुकलेट चे विमोचन केले. त्यानंतर श्री विशाल भगत प्रमोटर,विश्वजित यवतीकर यांनी देशाच्या विकासा बाबत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित भारता बाबत घेण्यात आलेली शपथ उपस्थित लाभार्थींना तसेच नागरिकांना दिली .यात्रे मध्ये ग्रामीण रुग्णालय तेल्हारा यांनी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी केली त्या मध्ये बी पी , शुगर, सी बी सी ,लिक्विड प्रोफाईल, आय सी टी सी ,एच बी आय १ सी ,थायरॉईड , इत्यादी टेस्ट मोफत करण्यात आल्या . महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी विभाग यांनी वीज बिल कमी करण्याबाबत सोलर पावर प्लांट बाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली तसेच रेणुका गॅस एजन्सी तेल्हारा यांनी लाभार्थी यांना उज्वला योजने बाबत माहिती देवून लाभार्थ्यांना उज्वला गॅस कीट चे वाटप केले .नगर परिषद अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजने चे पी एम स्वनिधी ,आवास योजना ,स्वच्छ भारत अभियान ,आयुष्यमान भारत योजना , पं. दीनदयाल अन्तोदय योजना , राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ,विश्वकर्मा योजना इत्यादी योजनेचे स्टोल लावण्यात येऊन उपस्थित नागरिकांना सदर योजने बाबत माहिती देऊन लाभ देण्यात आला .कार्यक्रमांचे संचालन तेल्हारा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी शंतनू यादवराव वक्ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले तर कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री भारत बोदडे संगणक अभियंता यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हिरालाल अग्रवाल कार्यालय अधीक्षक, श्री निनाद आचार्य पाणीपुरवठा अभियंता ,श्री नागेश भाकरे लेखापाल ,श्री रुपेश जोगदंड अग्निशमन विभाग प्रमुख ,श्री संजय झिरमिरे ,श्री मंगेश डोरले सी एल टी सी ,श्री सुभाष पवार ,शेख मजीद ,सुरेश नागोलकर ,श्री संजय चोकणे ,श्री मनोजकुमार मानकर ,श्री विजय आडे ,संदीप बायड ,श्री जयवंत बोळे, श्री उद्धव पहुरकर,श्री चंद्रकांत हागे, श्री बोरसे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला तेल्हारा शहरातील नागरिकांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button