महाराष्ट्र
संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा येथे नाफेड अंतर्गत हमीभावाचा तुर व हरभरा खरेदी केंद्र शुभारंभ!!!

स्टार भारत लाइव एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की राज्य व केंद्र सरकार यांनी शेतकरी यांचे हित जोपासत त्यांच्या शेतीच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून नाफेड अंतर्गत सर्व पिकांना हमीभाव जाहीर केले असून सध्या तूर व हरभरा ही पिके शेतकऱ्यांच्या घरामध्ये आलेले आहेत त्या अनुषंगाने विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत पातुर्डा येथील शेतकरी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित पातुर्डाकडून सन 2025 26 साठी दिनांक 4 मार्च रोजी तुर व हरभरा खरेदी केंद्र सुरु झाली असून तुरीचे शासकीय हमीभाव 8000 रुपये तर हरभरा 5875 रुपये आहेत यावेळी विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूरचे माजी संचालक श्री विश्वनाथ झाडोकार यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आलेला आहे यावेळी खरेदी-विक्री संचालक संजय वाकडे सोसायटी सचिव संजय पांडे संचालक सतीश चोपडे शेतकरी विलास भड गौतम गाडे विठ्ठलराव हिलामे सुनील महाले इत्यादी शेतकऱ्यांची उपस्थिती होती नाफेड अंतर्गत पातुर्डा येथील शेतकरी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री सहकारी संस्था पातुर्डा येथे हे केंद्र सुरू झाले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र विश्वनाथ झाडू का पाचोरा यांनी सर्व शेतकऱ्यांना केलेले आहे.✍️



