संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी प्रदीप वडोदे तर उपसभापती पदी उमेश टावरी यांची अविरोध निवड!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर,:-रतन भगत.
संग्रामपूर दि.१०/३/२०२६:- सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रदीप भगवान वडोदे तर उपसभापती पदी उमेश अशोक कुमार टावरी यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. बाजार समितीचे तत्कालीन सभापती भाऊराव पाटील अवचार व उपसभापती संजीव इंगळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदांचा राजीनामा दिल्याने दोन्ही रिक्त जागेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सहकार अधिकारी आमले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर संचालक यांच्या उपस्थितीत सभापती व उपसभापती निवड बैठक पार पडली. प्रदीप वडोदे आणि उमेश टावरी यांनी अर्ज दाखल केले असता सभापतीपदी प्रदीप वडोदे तर उपसभापतीपदी म्हणून उमेश टावरी यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आमले यांनी जाहीर केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पंकज मारोडे यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित सभापती वडोदे उपसभापती टावरी यांचे संचालकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश राजनकर ,बाजार समितीचे संचालक राजेंद्र वानखडे ,अभयसिंग मारोडे, संजीव इंगळे ,राहुल शिरसोले व कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व कर्मचारी उपस्थित होते. अविरोध निवडून आलेल्या सभापती व उपसभापती यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यकाळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारामध्ये चांगलीच कामगिरी पार पडेल अशी सर्व जनतेची आशा आहे…



