बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भ

धक्कादायक उघड! मलकापूर सहकारात ‘बोगस प्रमाणपत्र रॅकेट’चा संशयभरतीत घोटाळ्याची दुर्गंधी; जबाबदारी झटकण्याचा प्रकार संतापजनक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मलकापूर(हॅलो मलकापूर):
मलकापूरच्या सहकार क्षेत्रात उघडकीस आलेल्या बोगस अनुभव प्रमाणपत्र प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, हा केवळ एकच प्रकार नसून मोठ्या रॅकेटचा भाग असू शकतो, असा ठोस संशय व्यक्त केला जात आहे. नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाखाली बनावट कागदपत्रांची उघडपणे देवाणघेवाण होत असल्याचा आरोप होत असून, संबंधित संस्थांची भूमिका अधिकच संशयास्पद ठरत आहे.

‘राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था’ (मलकापूर) आणि ‘नांदुरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक’ (नांदुरा) यांची नावे समोर आल्यानंतरही दोन्ही संस्थांकडून “आमचा संबंध नाही” असा बचाव केला जात आहे. मात्र, अधिकृत लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर करून तयार झालेले प्रमाणपत्रे नेमके कुठून आली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे “ही फक्त चूक की संगनमत?” असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.

भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह!
नांदुरा अर्बन बँकेच्या भरती प्रक्रियेतच मोठी पोकळी असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी झाली का? बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन का टाळण्यात आले? की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? या प्रश्नांनी आता जोर धरला आहे.

कारवाईत दिरंगाई का?
प्रकरण समोर आल्यानंतरही संबंधित पतसंस्थेकडून पोलिसांत तक्रार दाखल न करणे, अंतर्गत चौकशीबाबत मौन राखणे आणि जबाबदारांवर कारवाई न करणे—हे सर्व प्रकार संशय अधिक गडद करणारे ठरत आहेत. “ज्यांच्या शिक्क्यांचा गैरवापर झाला, तेच गप्प का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

मोठ्या घोटाळ्याचा धागा?
स्थानिकांमध्ये चर्चा आहे की, हा प्रकार केवळ एक-दोन प्रमाणपत्रांपुरता मर्यादित नसून, गेल्या काही वर्षांत अशा अनेक बोगस प्रमाणपत्रांची निर्मिती झाली असू शकते. यामागे संगठित रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

जनतेचा इशारा :
आज सहकार क्षेत्रात उघड झालेला हा प्रकार उद्या शासकीय व निमशासकीय भरती प्रक्रियेलाही बाधा आणू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button