बुलढाणा
बेरोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवा- तालुका प्रमुख रामेश्वर थारकर ( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव यांचे वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून भव्य बेरोजगार मेळाव्याचे आयोजन स्थानिक वर्धमान भवन येथे रविवार दिनांक २६/ ११/ २०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले असून या बेरोजगार मेळाव्यात नामांकित ५० मल्टी नॅशनल कंपन्याचे प्रतिनिधी तालुक्यातील ५ हजार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे रोजगार देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत या मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी नोंदणी अर्ज व बायोडाटा घेऊन हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेगाव तालुका शिवसेना प्रमुख तथा सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष रामेश्वर थारकर पाटील यांनी केले आहे






