श्री व्यंकटेश महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा; स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आयोजित पुरुष गटासाठी ची आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीराम शिपने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे बांधकाम सभापती विष्णू झोरे व श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे व पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे बी झोन अंतर्गत आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्याचा बहुमान श्री व्यंकटेश महाविद्यालयास मिळाला. या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील तब्बल २२ संघांनी नोंदणी केली होती. दोन दिवस पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती यांनी विजेतेपद पटकावले. माऊली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, शेगाव यांनी उपविजेतेपद पटकावले. विजेत्यांना गोल्ड मेडल व चषक तसेच उप विजेत्यांना सिल्वर मेडल व चषक प्रदान करण्यात आला. रेफरी म्हणून शहजाद खान व अँथनी फ्रान्सिस यांनी भूमिका पार पाडली.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शुभेच्छा व अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी विजेत्या व उपविजेत्या गटातील सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर जाधव यांनी व पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. किरण मोगरकर यांनी व आभार डॉ. पी. बी. पवार तसेच प्रा. बी. यु. काळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



