खानदेशजळगावा जिल्हापत्रकारबुलढाणामहाराष्ट्र

मुक्ताईनगरात जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात

मुक्ताईनगरात जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात – पत्रकारांच्या कार्याला प्राचार्य व्ही.एम. चौधरी यांचा सलाम
मुक्ताईनगर, दि. 6 जानेवारी :
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील जगजीवन दास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात स्थानिक पत्रकारांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एम. चौधरी होते. आपल्या मनोगतात त्यांनी पत्रकारितेच्या योगदानाचे महत्त्व विशद करत सांगितले की, “पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत. त्यांच्या निर्भीड लेखनामुळे अन्यायाला वाचा फुटते आणि विकासाला दिशा मिळते. मुक्ताईनगरच्या जडणघडणीत पत्रकार बांधवांचे कार्य मोलाचे आहे.”
विद्यार्थ्यांसमोर पत्रकारांनीही आपले अनुभव व्यक्त केले. ग्रामीण भागातील प्रश्न, शिक्षण, शेती, आरोग्य आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी माध्यमांची भूमिका किती प्रभावी ठरते यावर त्यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर आधारित छोटेखानी सादरीकरण करून आद्य पत्रकारास अभिवादन केले.
या वेळी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या लोकहिताच्या लढ्याला शाळा नेहमीच पाठबळ देईल, अशी ग्वाही देत प्राचार्य चौधरी यांनी पत्रकारांच्या कार्याला सलाम केला.
सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button