श्री गणेश विद्या मंदिर शाळेत अमृत महोत्सवा निमित्त देश भक्ती गीत गाण्यांच्या गायन स्पर्धादिवा –

श्री गणेश विद्या मंदिर शाळेत अमृत महोत्सवा निमित्त देश भक्ती गीत गाण्यांच्या गायन स्पर्धादिवा –
( सचिन शेलवले ) दिनांक 14/8/2023 रोजी श्री . गणेश विद्यामंदिर प्राथमिक विभाग इयत्ता १ ली ते ४थी पर्यंतच्या मुलांच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशभक्ती गीतांवर आधारीत गायन स्पर्धा शाळेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या . या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे संस्थेचे सचिव साईनाथ म्हात्रे व संचालिका केतकी म्हात्रे तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अनिल भोईर सर व संगणक तज्ञ मनोज सर तसेच प्राथमिक विभागाचे सचिन पाटील, सचिन शेलवले, नलिनी पाटोळे मॅडम, रजनी येडगे, रेश्मा बडमे, मीरा देशमुख, माधवी शिंदे, भारती मॅडम, प्रेरणा जाधव मॅडम या उपस्थित होत्या . परिक्षक म्हणुन शिक्षकच नेमले होते .सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे तयारी केली होती . त्यात मुलांना पालकांनी सुद्धा प्रोत्साहीत केले होते . त्यांचे सुद्धा सहकार्य होते . इयत्ता १ ली ते ४थी मधून तीन स्पर्धक निवडले . त्यांच्या गाण्यात ताल, स्वर, लय तसेच सुंदर गायन होते . सर्व मुले धिटाईने माईक मध्ये येऊन गाणी तालासुरात म्हणत होती .हा कार्यक्रम घेण्याचा हेतू मुलांच्या सुप्त गुणांना वाव कसे देता येईल भविष्यात ही मुले कशी पुढे जातील हा शाळेचा हेतू होता . त्या तिन मुलांना शाळेकडुन प्रथम, व्दितिय व तृतीय पारितोषिके देण्यात आली . गार्गी देवदास कदम १ ली, सुजल सदाशिव खोराटे ३ री आणि साईदास सचिन बुरटे ३ री या स्पर्धकाना बक्षिसे देण्यात आली .या गाण्यातुन मुलांचा देशाविषयी असणारा अभिमान जागृत होत होता . सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते . सर्वांना हॉलमध्ये प्रसन्न वाटत होते . बक्षीसे देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .



