महाराष्ट्रसामाजिक
जलंब येथील तरूण बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव तालुक्यातील जलंब येथील रहिवासी सुनिल रविंद्र खोंदील (१९) हा तरूण ५ फेब्रुवारी २४ रोजी सकाळी
८.३० वाजताच्या सुमारास शेगाव येथे आयटीआयला जातो असे सांगून घरून निघून गेला. परंतू उशिरापर्यंत घरी परतला नाही त्याचा सर्वत्र शोध घेतला असता मिळून आला नाही.
त्यामुळे रविंद्र ज्ञानदेव खोंदील यांनी जलंब पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीवरून पो.स्टे. मध्ये बेपत्ताची नोंद केली असून पुढील तपास पोहेकॉ नन्हेखॉ तडवी करीत आहे



