पोलीसनेच केलामहिलेचा विनयभंग

रक्षकच बनले भक्षक
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव | पोलीस शिपायाने एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पिडीत महिलेने शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली असून फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी पोलीस शिपायाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मोहन समाधान करांगळे वय ३५ वर्षे रा. वार्ड नं. २, नांदुरा हा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे पोलीस दलात कार्यरत आहे. ४ ऑक्टोबर रोजी आरोपीने फिर्यादीच्या शेगाव येथील राहते घरी पोहोचून फिर्यादीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. शहर पोलिसांनी फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी विरुध्द कलम ३५४, ३५४ अ, ४५२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास शेगाव शहर पो.स्टे. चे | पोउपनि आशिष गंद्रे हे करित आहेत.



