बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळालेच पाहिजे; वीज अधिकाऱ्यांना आमदार श्वेता महाले पाटील यांचा सज्जड दम

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस

आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना…

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी उभी पिके वाचविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात वीज नसणे, वीज आली तर रोहित्र जळणे, दाब कमी-जास्त होणे, वारंवार वीज खंडित होणे अशा समस्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वीज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना चांगलाच सज्जड दम दिला.

शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, अनेक वेळा अधिकारी फोन उचलत नाहीत, फोन घेतला तरी शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर दिले जात नाही. त्यातच शेतकऱ्यांशी बोलताना काही अधिकाऱ्यांचा अहंकारीपणा दिसून येतो, अशा तक्रारी आमदार श्वेता महाले पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या सर्व बाबी त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडल्या.

“शेतकरी अडचणीत असताना त्याचा फोन उचलणे आणि त्याची अडचण समजून घेणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांशी उद्धटपणे किंवा अहंकाराने बोलणे अजिबात सहन केले जाणार नाही,” अशा शब्दांत आमदार श्वेता महाले यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

सध्या पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठ्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात येत आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा, रोहित्र जळाल्यास ते लवकरात लवकर दुरुस्त अथवा बदलून द्या आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

शेतकऱ्याने कष्ट करून उभे केलेले पीक केवळ वीज विभागाच्या दुर्लक्षामुळे वाया जाता कामा नये. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असेही आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांना योग्य उत्तर देणे, वीजपुरवठ्यातील अडचणी दूर करणे आणि रोहित्रांबाबतच्या समस्या त्वरित सोडविणे यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी वीज विभागाला स्पष्ट शब्दांत सूचना देत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला…बैठकीसाठी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यासोबत खालील अधिकारी उपस्थित होते.

1)अधीक्षक अभियंता, महावितरण, परिमंडळ बुलढाणा,
2)कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग बुलढाणा
3) उपविभागीय अभियंता, उपविभाग धाड
4)उपविभागीय अभियंता, उपविभाग चिखली
5)उपविभागीय अभियंता, उपविभाग उदयनगर
6)अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मेंटेनेस विभाग, महावितरण बुलढाणा

तसेच शहराध्यक्ष भाजप बुलढाणा मंदार बाहेकर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button