आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हा

जामनेर-पाचोरा रेल्वे प्रकल्प : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रक्षाताई खडसे आघाडीवर

जामनेर । प्रतिनिधी

जामनेर शहरातील भाजपा कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी “जामनेर–पाचोरा–बोदवड” ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल ९५५ कोटींचा निधी पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत मंजूर केला असून, भूसंपादनासाठी स्वतंत्रपणे १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

बैठकीदरम्यान जामनेर, पहूर आणि बोदवड परिसरातील शेतकऱ्यांनी भूसंपादन कायदा २०१३ नुसार योग्य मोबदला मिळावा, अशी ठाम मागणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे असे की, २००८ च्या कायद्यानुसार कमी दराने संपादन न करता २०१३ च्या कायद्याप्रमाणे न्याय्य दर देण्यात यावा.

रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन देत, पुढील आठ दिवसांत थेट रेल्वे बोर्ड अध्यक्षांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रकल्पातील अडथळे दूर करून विकास व शेतकऱ्यांचा न्याय एकत्र साध्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास केवळ प्रवासाची सोय सुलभ होणार नाही, तर स्थानिक शेतीमाल, व्यापार आणि उद्योगालाही नवे दालन खुले होणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचा विचार होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विकासाच्या नावाखाली अन्याय होईल, ही शेतकऱ्यांची भीती अनाठायी नाही.

शेवटी, रक्षाताईंची शेतकरी संवाद बैठक ही विकासाच्या गतीला मानवी संवेदनशीलतेची जोड देणारी ठरली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button