अपघातबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव व खामगाव रोडवर भीषण अपघातदुचाकीस्वार जागीच मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव दिनांक २२\६\२६ रोजी दुपारी १२ वाजता सुमारास खामगाव रोडवर माऊली वॉटर पार्कच्या पुढे काही अंतरावर एक चार चाकी आणि दुचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात नवा अंदुरा ता. बाळापूर ५३ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
या घटनेसंदर्भात फिर्यादी अनिकेत नागोराव झाडे, वय २९ वर्षे, रा.नवा अंदुरा ता. बाळापूर यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे काका तथा घटनेतील मृतक शिवशंकर तुळशीराम झाडे वय ५३ रा. नवा अंदुरा हे मोटार सायकलने शेगाववरुन खामगावकडे जात असतांना माऊल वॉटर पार्कच्या पुढे काही अंतरावर एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्र. एमएच २३ एएस ००९० च्या चालकाने फिर्यादी यांचे काका यांचे मोटार सायकल क्र. एमएच-३०-एन-९७३० ला समोरुन ठोस मारुन फिर्यादी यांचे काका शिवशंकर तुळशीराम झाडे यांचे मारणास व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. अपघात झाल्यानंतर कार चालक याने अपघाताची माहीती पोलीस स्टेशनला न देता घटनास्थळावरुन पळ काढल्या तक्रारीत नमूद असून घटनेचा तपास एएसआय गजानन पाटील हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button