बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव प्रवासी संघटनेचे वतीने ना. प्रतापराव जाधव यांना निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव : केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेगाव भेटीदरम्यान शेगाव प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेऊन शेगाव स्थानकावर गाड्यांच्या थांब्यांबाबत चर्चा केली व निवेदन सादर केले. चर्चे दरम्यान संघटनेतर्फे सांगण्यात आले की, सध्या शेगावसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रावर अनेक गाड्या थांबत नाहीत. यामध्ये नुकतीच सुरु झालेली भगत की कोठी (जोधपूर) एक्सप्रेस, मुंबई-बल्लारशाह एक्सप्रेस, हैद्राबादजयपूर एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. यापैकी काही गाड्या छोट्या, कमी प्रवासीसंख्या आणि कमी महसूल असलेल्या स्थानकांवर थांबतात, मात्र शेगावसारख्या ३ दर्जाच्या आणि दरवर्षी सुमारे १४० कोटी महसूल देणाऱ्या स्थानकावर थांबा
नाही, ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले. शेगाव स्थानकावर आता तिसऱ्या प्लॅटफॉर्म लाईनचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे गाड्यांचे थांबे देण्यासाठी आवश्यक सुविधा येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे आगामी काळात अधिक गाड्यांचे थांबे येथे दिले जाणे अत्यावश्यक आहे. यावेळी ना. प्रतापराव जाधव यांनी प्रवासी संघटनेला आश्वासन दिले की ते स्वतः या विषयाचा पाठपुरावा करतील आणि शेगाव स्थानकावर गाड्यांचे थांबे मंजूर करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करतील. निवेदन सादर
करताना बरुण नागपाल व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अॅड. पुरुषोत्तम डांगरा उपस्थित होते. या निवेदनावर अॅड. पुरुषोत्तम डांगरा, पत्रकार संजय त्रिवेदी, बजरंग दलाचे सोमेश कांबळे, माहेश्वरी बुवा संघाचे अंकुश चांडक, मारवाडी युवा संघटनेचे अध्यक्ष राहुल अग्रवाल, तसेच विश्व हिंदू परिषदचे विजय राठी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश सोमानी, सचिन अग्रवाल, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष वरुण नागपाल, अखिल भारतीय माहेश्वरी संघाचे सदस्य मयुर मुहना, ग्राहक पंचायत सदस्य सुरेश धूत, विश्व हिंदू परिषद शेगाव शाखाध्यक्ष मनीष नरनोलिया, शेगाव बार असोसिएशन सदस्य अॅड. मनोज जैन, समाजसेवक दिनेश बानोले, शिवसेना उपतालुका प्रमुख ऋषिकेश शेजोळे, समाजसेवक ऋषिकेश कुलकर्णी आणि इतर यांच्या सह्या आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button