महाराष्ट्रविदर्भसामाजिक

शेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मनसगांव येथे ग्रामपंचायतीवर वंचित चा झेंडा

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

शेगांव – ग्रामपंचायत तिची निवडणूक असली म्हणजे रिंगा रिंगेची निवडणूक म्हणून ओळखले जाते परंतु सरपंच पदाचा मानकरी कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यातच ग्रामपंचायत मनसगांव येथील माजी ग्रामपंचायतचे सरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदी शिला मुरलीधर चराटे तर उपसरपंच पदी स्वाती गोपाल चांदुरकर
मौजे गावचे सरपंच पदावर कार्यरत असलेले माजी सरपंच सौ विद्या शैलेश कंकाळ यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा ११/०३/२०२४ दिला.राजीनामा दिल्यानंतर गावातील सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते सय्यद साजिद होते. ग्रामपंचायत सदस्यांचे त्यांना ४ मते पडली.वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष मोहन कराळे यांच्या पत्नी अशा मोहन कराळे यांनी देखील वंचित चे कार्यकर्ते असलेले शिला-मुलीधर चराटे यांना पाठिंबा न देत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. व आपले सरपंच पदाच्या मूल्य मत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिले.ग्राम पातळीवर वंचित बहुजन आघाडी मध्ये खिंडार. सय्यद साजिद यांना पडलेली एकूण ४ सदस्यांची मते.आशा मोहन कराळे,संतोष विश्वासराव कराळे, मनोज लक्ष्मण चराटे.शीला मुरलीधर चराटे यांना सय्यद साजिद विरोधात पडलेली मते.विद्या शैलेश कंकाळ, निता सुरेश कराळे,सुरेश शिवाजी कराळे, सौ स्वाती गोपाल चांदुरकार,परंतु तेवढ्यातच चार पाच ने लढत सरपंच पदाचे दावेदार शीला मुरलीधर चराटे हे ठरले. यादरम्यान १५/०४/२०२४ रोजी वंचितचे खंदे समर्थक शीला मुरलीधर चराटे यांची सरपंच पदी निवड झाली.तलाठी मानटे,मंडळ अधिकारी चांबारे,ग्राम सेवक एन, जे,चव्हाण यांच्या निवड निरीक्षणाखाली निवड करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button