जळगावा जिल्हा

मस्तान शाहवली दर्ग्यास रथोत्सवाचे निमंत्रण

मस्तान शाहवली दर्ग्यास रथोत्सवाचे निमंत्रण
रावेर प्रतिनिधी

दत्त जयंतीनिमित काढण्यात येणाऱ्या रथ सोहळ्याचे निमंत्रण संत हजरत मस्तानशाहवली बाबा यांना देण्यात आले. यावेळी पंच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सच्चिदानंद महाराज व संत मस्तानशाहवली बाबा हे समकालीन होते. शहनाईच्या मंगल स्वरात व भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या दिंडी सोहळ्यात गादीपती श्रीपाद कुलकर्णी यांचे पुत्र ऋषीकेश कुलकर्णी महाराज
यांच्याहस्ते निमंत्रण देण्यात आले. रावेरला दत्त जयंती रथ व पालखी उत्सव सप्ताहाला ४ डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे. ९ डिसेंबर रोजी दत्त कृष्ण रथोत्सव तर दि १० डिसेंबर रोजी विठ्ठल रखुमाई व सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या मेण्याचा पालखी सोहळा साजरा होत आहे.
दत्त मंदिरात हिंदू मुस्लीम पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. संकटमोचक थड्याच्या मारुती मंदिरात रथोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. ऋषिकेश कुलकर्णी महाराज
यांनी हजरत मस्तानशाहवली बाबा यांच्या दर्गाहवर चादर अर्पण केली. मौलाना शेख फरीद शेख शरीफ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी धनंजय चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, कांतीलाल महाराज, दारा मोहम्मद, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, अशोक शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर महाजन, दिलीप पाटील, संतोष पाटील, महेमूद शेख, दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, कन्हैयालाल अग्रवाल उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button