बुलढाणामहाराष्ट्र

रुग्णांच्या वेदनांना विधानसभेत वाचा; आरोग्य सुविधांसाठी श्वेता महाले आक्रमक..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुखा: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

ग्रामीण रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, नवीन आरोग्य केंद्रे व प्रलंबित कामांसाठी आरोग्यमंत्री विशेष बैठक लावणार..

चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून प्रभावीपणे आवाज उठविला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे विशेष बैठकीची मागणी करत मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असलेल्या एका नवजात बालकाच्या कुटुंबाला आलेल्या अडचणींचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सलग शासकीय सुट्ट्यांमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क होऊ न शकल्याने उपचार पूर्ण होऊनही बालकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकला नव्हता. अशा परिस्थितीत दाखल केलेल्या फाईलच्या आधारे रुग्णांना तातडीने डिस्चार्ज देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

यासोबतच चिखली मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या विस्तारासंदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रश्नही त्यांनी मांडले. चिखली येथील ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन, धाड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांमध्ये रूपांतर, अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन, मासरूळ येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, तसेच धोडप येथे मंजूर झालेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच रायपूर (ता. जि. बुलढाणा) आणि उदयनगर (उंद्री) (ता. चिखली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी मिळूनही कामे सुरू झाली नसल्याची बाब त्यांनी सभागृहात मांडली आणि ही कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच चिखली मतदारसंघातील विविध शासकीय रुग्णालयांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात त्यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

चिखली मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ व सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असा विश्वास आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला…✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button