बुलढाणामहाराष्ट्र

श्री व्यंकटेश महाविद्यालयात रेझ्युमे लेखन व मुलाखत कौशल्य प्रशिक्षण संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कट्टा, करिअर समुपदेशन, रोजगार व स्वयंरोजगार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रेझ्युमे लेखन व मुलाखत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रभावी रेझ्युमे तयार करण्याची पद्धत, रेझ्युमेमध्ये आवश्यक माहितीचा समावेश, मुलाखतीची तयारी, मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने संवाद साधण्याचे तंत्र तसेच रोजगाराच्या संधीसाठी आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव राजा येथील कु. शुभांगी गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना रेझ्युमे तयार करताना आवश्यक बाबी तसेच मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि विषयाचे ज्ञान यांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वाणिज्य विभागप्रमुख, डॉ. नरेंद्र शेगोकार यांनी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक असलेल्या रेझ्युमे लेखन व मुलाखत कौशल्यांची माहिती मिळून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास आणि करिअर नियोजनास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर संसद उद्योजकता विकास मंत्री कु. प्रांजल खार्डे, प्रास्ताविक समन्वयक प्रा. डी. एम. शिंब्रे व आभार
रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. वाय. माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पी. बी. पवार, प्रा. एस. जे. चव्हाण, रासेयो महिला कार्यकम अधिकारी डॉ. ज्योती ढोकळे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पवन कदम, डॉ. डी. आर. बिऱ्हाडे व डॉ. जी. जी. ढगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता रासेयोची प्रार्थना खरा तो एकची धर्म ने झाली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button