Uncategorized

उत्सवातही पोषणाबरोबर , शिक्षणावर भर पोषण अभियानाची जनजागृती‌.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- तालुक्यामध्ये दिनांक 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत सप्टेंबर महिन्यात प्रत्येक दिवशी पोषण आहाराबाबत जनजागृतीवर विविध कार्यक्रम राबवले जात आहेत .
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय जोल्हे यांचे आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी मालेगाव व वाशिम मदन नायक , विस्तार अधिकारी व पर्यवेक्षिका, यांचे मार्फत सार्वजनिक गणपती उत्सव आणि गौरी आगमनानिमित्त राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महिन्यानिमित्त सार्वजनिक गणेश मंडळ तसेच गौरी स्थापना झालेल्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत भेटी देऊन जनजागृती सुरू आहे त्यामुळे प्रत्येक घटकापर्यंत पोषण अभियान पोहोचण्याचे काम मालेगाव तालुक्यातील शिक्षण,आरोग्य, एम एस आर एल एम , महिला व बालकल्याण व इतर सर्व विभागामार्फत सुरू आहे अशाच प्रकारे पर्यंत दररोज जनजागृती केली जात आहे .
पोषण अभियानादरम्यान या वर्षीची पोषण माह खालील आधारीत विषयांवर दैनंदिन जनजागृतीचे कार्यक्रम अंगणवाडी स्तरावर सुरू आहेत यामध्ये ऍनिमिया, ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक पोषण आहार पोषण भी और पढाई भी दोन्ही महत्वाचे आहेत, उत्तम प्रशासनासाठी , जीवन शैलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, एक पेड मा के नाम अंतर्ग वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित , गरोदर माता, किशोरवयीन मुली यांचा शोध घेऊन समुपदेशन करणे. पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका ,मदतनीस मार्फत सदर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button