Uncategorizedमहाराष्ट्रविदर्भ
नागरिकांनो,तेल्हारा सह हिवरखेड अकोट शहराला दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा
दि.२७ ;
सर्व नागरीकांना सूचीत करण्यांत येते की, वान प्रकल्पावरून, अकोट हिवरखेड सह तेल्हारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनच्या लिकेज दुरूस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोट विभागाने दि. २८/११/२०२३ व २९/११/२०२३ रोजी करावयाचे निश्चीत केले आहे. त्यामुळे दि. २८ व २९/११/२०२३ या दोन दिवसा मध्ये शहराला पाणी पुरवठा होणार नाही. त्यानुसार नागरीकांनी पाण्याचे नियोजन करून पाणी जपुन वापरावे ही विनंती
मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय तेल्हारा यांच्या मार्फत करण्यात आली आहे



