खानदेशजळगावा जिल्हा

पोलीस वसाहतीमध्ये गैरसोय सभापती शोभाताई इंगळे यांनी नगरपालिकेत विचारला प्रश्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

दिनांक 2/3/2026
रोजी भुसावळ नगरपरिषद च्या सभे मध्ये
मा. सभापती शोभा ताई इंगळे यांनी पोलीस वसाहत मधील अपुऱ्या सुविधा व पोलीस बांधव व त्यांचा परिवार सहन करत असलेल्या यातना यांना वाचा फोडली व प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले
कुठे काही झाले काही घडले तर सर्वात आधी पोलीस यांची मागणी होते . पोलीस बंधु सर्व नागरिकांचे सण उत्सव इमानदारीने बंदोबस्त राखून स्वतः परिवारा पासून लांब राहून नागरिकांचे उत्सव सुखरूप पणे पार पडतात
नगरपालिकेचा कर भारतात मग त्यांना नागरी सुविधा का नको
एक लाईट सुद्धा चालू नाही आहे ही शोकांतिका आहे .
रात्री अपरात्री ड्युटी करून थकून भागून आलेले माझे पोलीस बांधव अंधारात वसाहतीत सर्प व इतर विषारी जनावरे यांचा सामना करतात अशात जर काही अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण
लवकरात लवकर पोलीस वसाहतीत सुविधा पूर्वाव्यात अन्यथा आम्ही सर्व तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू असा इशारा सभापती यांनी आज नगराधक्षा व नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी यांना देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button