बुलढाणा

उदयनगरच्या अपात्र सरपंचाचे ‘पात्र’ असे काम; अडीच वर्षांचे मानधन शासन तिजोरीत जमा करणार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली (प्रतिनिधी )

मी करू शकतो तर चिखलीच्या आमदारांनीही करावे  : मनोज लाहूडकर

चिखली  : देशावर आर्थिक संकटाचे सावट असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणे आणि संसाधनांचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनगरचे अपात्र  सरपंच मनोज लाहूडकर यांनी  3 हजार रुपये महिना प्रमाणे अडीच वर्षांचे  ९० हजार रुपये मानधन शासन तिजोरीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयाची माहिती देताना मनोज लाहूडकर म्हणाले की, देश आर्थिक अडचणीच्या काळातून जात असताना लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. मी अपात्र सरपंच असूनही अडीच वर्षांचे मानधन शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला. मग चिखली मतदारसंघाच्या आमच्या आमदारांनीही त्यांच्या आतापर्यंतच्या साडेसात वर्षाच्या कारकीर्दीचे ( ९० महिन्यांचे ) ३ लाख १ हजार रुपये महिना याप्रमाणे २ कोटी ७० लाख ९० हजार रुपये मानधन  शासन तिजोरीत जमा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मनोज लाहूडकर म्हणाले की, आमच्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी देशहितासाठी पुढे येत त्यागाची भूमिका घ्यावी. आमदार श्वेता ताई महाले यांनी आपले आतापर्यंतचे २ कोटी ७० लाख ९० हजार रुपये असे संपूर्ण मानधन शासन तिजोरीत जमा करून त्याचे दस्तऐवज व समाजमाध्यमांवर जाहीर करावेत. त्यांनी असे केल्यास त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षावरील निष्ठा सिद्ध होईल.

आमदार श्वेता ताई महाले यांनीच मला अपात्र सरपंच केलेले आहे. आता मी पात्र आहे की नाही हे न्यायालयच सांगेल.  तरी मी अपात्र  सरपंच असूनही देशहितासाठी माझे मानधन

व

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button