बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शिंगणे नगर येथे नवयुवक गणेश मंडळाचे भव्य रक्तदान शिबीर संपन्न; ३९ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:स्थानिक शिंगणे नगर येथील नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने आज, मंगळवार दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. दिवसभरात एकूण ३९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या शिबिराला प्रामुख्याने माजी आमदार डॉ. शशिकांतजी खेडेकर आणि नगरसेवक आतिश खराट यांची सन्माननीय उपस्थिती लाभली होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना व तरुणांना संबोधित करताना ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असल्याचे प्रतिपादन केले. तसेच रक्तदान केल्याने शरीराला होणारे विविध आरोग्यदायी फायदेही त्यांनी आवर्जून समजावून सांगितले. नगरसेवक आतिश खराट यांनी तरुणांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन केले.

शिंगणे नगर येथे पार पडलेले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नवयुवक गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी मंडळाच्या या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button