जळगावा जिल्हासामाजिक

सोनार समाज मुक्ताईनगर तर्फे मयुरी ठोसर प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

जळगाव जिल्ह्यातील सुंदर मोतीनगर, जळगाव येथे दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी घडलेल्या मयुरी गौरव ठोसर या 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेप्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व सोनार समाज मुक्ताईनगर तर्फे करण्यात आली आहे.
या संदर्भात समाजाच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मयुरी ठोसर हिने सासरी मंडळींकडून होणाऱ्या त्रासामुळे, सततच्या छळामुळे व मानसिक वेदनांमुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण समाजात संताप व दु:ख व्यक्त होत आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, लग्नाला अवघे चार महिने होताच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे मयुरीने आत्महत्या करणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. अशा घटनांमुळे समाजातील स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असून समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कोणतीही हलकी कारवाई न होता कठोर व उदाहरणादाखल शिक्षा करावी.
सदर प्रकरणी आरोपी म्हणून पती – गौरव ठोसर, जेठ – गणेश किशोर ठोसर, सासरे – किशोर ठोसर आणि सासू – लता किशोर ठोसर यांची नावे नमूद आहेत. या सर्व आरोपींना कठोर शिक्षा देऊन त्यांची जामीन अर्ज मंजूर होऊ नये, अशी मागणीही सोनार समाजाने केली आहे.
तसेच या प्रकरणातील तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून सामाजिक जनजागृती मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव तसेच तहसीलदार, मुक्ताईनगर यांनाही देण्यात आली असून प्रकरणी तातडीने व कठोर कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदन देते वेळी प्रवीण शुरपाटणे, प्रकाश सोनार, वैभव सोनार, गजानन सोनार, श्रीकृष्ण रत्नपारखी अशोक तळेकार, वैष्णवी रत्नपारखी, संगीता उज्जैनकर, रूपाली हिरडकर, कल्पना इटणारे, ललिता बुडूखले, पोर्णिमा सोनार व आदी महिला-पुरुष सोनार समाज बांधव उपस्थित होते.

मयुरी ठोसर प्रकरणी सोनार समाजाचे निवेदन; मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे उपस्थित

मयुरी ठोसर प्रकरणी सोनार समाजाने मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. यावेळी प्रारंभिक मानव अधिकार संघटन व महिला अपराध नियंत्रण संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मोहन मेढे हेही उपस्थित होते. समाज बांधवांनी निवेदनाची प्रत त्यांनादेखील प्रदान केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button