महाराष्ट्र

वेरूळ महोत्सवाच्या धरतीवर (राष्ट्रमाता जिजाऊ उत्सव) साजरा करा.

आमदार मनोज कायंदे यांची सांस्कृतिक मंत्र्याकडे मागणी. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधीगजानन खिल्लारे. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मा साहेब यांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा येथे दरवर्षी होणारा जिजाऊ जन्मोत्सव आता अधिक भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांना पत्र लिहून, सिंदखेड राजा येथे वेरूळ महोत्सवाच्या धरतीवर १० दिवसाचा (जिजाऊ उत्सव). शासकीय स्तरावर साजरा करण्याची मागणी केली आहे. आमदार मनोज कायंदे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, सिंदखेड राजा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. येथे दरवर्षी १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या उत्सवाची व्याप्ती वाढून तो केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, ३ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ असा सलग १० दिवस साजरा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीनगर येथील जगप्रसिद्ध (वेरूळ महोत्सव) ज्याप्रमाणे सांस्कृतिक विभागाच्या वतीने साजरा केला जातो, त्याच धर्तीवर सिंदखेड राजा येथे हा १० दिवसाचा (जिजाऊ उत्सव) सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित करावा, अशी आग्रही विनंती आमदार मनोज कायदे यांनी पत्राद्वारे केली आहे. आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार या मागणीवर काय निर्णय घेतात आणि आगामी जानेवारीत सिंदखेड राजा येथे १० दिवसाचा सांस्कृतिक सोहळा रंगणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शासनाने ही मागणी मान्य केली तर सिंदखेड राजा येथे १० दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक देखावे आणि विचाराचे मंथन पाहायला मिळेल. यामुळे केवळ जिजाऊ च्या विचाराचा प्रचार होणार नाही, तर सिंदखेड राजा येथील पर्यटनाला ही मोठी चालना मिळेल. बुलढाणा जिल्हा वाशी यांच्यावतीने ही मागणी करण्यात आल्याचे आमदारांनी पत्रात म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button