गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथे लॉजवर आणून दुकान मालकाने मालाच्या नाव खाली २५ वर्षीयवि वाहितेव क्रूरता

शेगाव येथे लॉजवर आणून २५ वर्षीयविवाहितेवर बलात्कार; युवकावर गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी शाम पहूरकर शेगाव :- तेल्हारा येथील लेडीज गारमेंट दुकानात काम करणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेला दुकानमालक युवकाने कपडयांचा माल घेण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावून लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.तेल्हारा शहरातील एका लेडीज गारमेंट दुकानात २५ वर्षीय विवाहिता मजुरीने काम करते. दरम्यान १ मार्च रोजी दुकान मालक वैभव विजयसिंग मलीये (३३) याने सदर विवाहितेस कपडयांचा मालघ्यायचा आहे असे म्हणून शेगावला बोलाविले व मंदिर परिसरातील श्रध्दा लॉजवर नेवून इच्छे विरुध्द तिच्यासोबत बलात्कार केला. तसेच तिचे फोटो काढून कुणाला काही सांगितल्यास जिवाने मारीन अशी धमकी दिली. याबाबत पीडित विवाहितेने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी वैभव मलीये याच्याविरुध्द कलम ३७६, ३५४ (क), ५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button