गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

विवाहितेचा पैशांसाठी छळ; सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । तुझ्या बापाने अपेक्षा पेक्षा कमी हुंडा दिला, माहेवरून अडीच लाख रुपये आण असे म्हणत सासरकडील मंडळीने विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ केल्याची तक्रार पिडीत महिलेने आज १३ जानेवारी रोजी शहर पो.स्टे.ला दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

या घटनेसंदर्भात फिर्यादी पिडीत विवाहिता रा. गोमाजी नगर शेगाव ह.मु. मोताळा जि. बुलडाणा यांनी शहर पो.स्टे.ला फिर्याद दिली की, सुदर्शन शत्रुघ्न पिसे वय ३१ वर्षे (पती), शंकुतला शत्रुघ्न पिसे वय ६० वर्षे (सासू), सुरज शत्रुघ्न पिसे वय ४१ वर्षे (जेठ), सर्व रा. गोमाजी नगर शेगाव, सपना महादेव गाढे वय ३८ वर्षे रा. रोकडीयानगर शेगाव, सौ. स्वाती पंकज भोजने वय ३५ रा. पिंप्री खोद्री पो. पिंपळगांव काळे ता. जळगाव जामोद यांनी संगनमत करून २ फेब्रु २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत फिर्यादीस तुझ्या बापाच्या कडून अडीच लाख रूपये आण, तुझ्या बापाने अपेक्षेपेक्षा कमी हुंडा दिला, असे म्हणत त्रास देऊन मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी शहर पोलीसांनी उपरोक्त पाचही आरोपींविरुद्ध कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोहेका संजय करुटले हे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button