बुलढाणामहाराष्ट्र
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची बदली…

जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा, 27 मार्च अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची बदली झाली आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त पदी आता महिला व बाल विकास पुणे, आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्वेता सिंघल भारतीय प्रशासकीय सेवेतील 2009 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत. बुलढाणा जिल्ह्यात त्यांनी प्रशिक्षण काळात कर्तव्य निभावले होते. श्वेता सिंघल यांच्याकडे तुर्तास कुठलाही कार्यभार देण्यात आला नाही. श्रीमती नयना गुंडे या अमरावती विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेणार आहे…✒️



