आंतरराष्ट्रीयजळगावा जिल्हा

विधानसभा निवडणूक ; राज्यात शरद पवारांची खरंच लाट आहे का?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतांना राज्यात शरद पवारांची लाट  असल्याची चर्चा होतांना दिसत आहे. शरद पवारांचे वय ८५ वर्षे असतांना देखील पक्ष बांधणी आणि महायुतीला मात देण्यासाठी राजकीय डाव टाकतांना दिसत आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांना धक्का देत दोनही पक्षाच्या तगड्या नेत्यांना पक्षात घेत आहे यामुळे राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात सुरु असलेली इनकमिंग मुळे राज्यात शरद पवारांची लाट असल्याची चर्चा होतं आहे.

स्‍ट्राईक रेटवर जोर…

राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) यांनी महाविकास आघाडीमधून जास्‍त जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा स्‍ट्राईक रेटवर पुन्हा जोर दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन ८५ वर चर्चा सुरु आहे.शरद पवारांच्या ८५ वाढदिवसानिमित्त ८५ आमदार निवडून देण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी केला आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे पुन्हा ‘स्ट्राईक रेट’ वर भर देण्यात आला आहे.सध्या महाविकासआघाडीमध्ये जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्‍सीखेच सुरु आहे. पण स्‍ट्राईक रेटवरच भर देणार असल्‍याचे धोरण पवार गटाचे आहे.

राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जोरदार इनकमिंग 

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच ऐन निवडणुका जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.माजी मंत्री आणि आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.काही दिवसांपूर्वी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे अजित पवारांना फलटणमध्ये मोठा धक्का बसला होता.या सोबतच अनेक बडे नेते ‘तुतारी’ हातात घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत असल्याने शरद पवारांची राज्यात लाट असल्याची चर्चा होतं आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button