बुलढाणामहाराष्ट्र

देऊळगाव राजा नगर परिषदेत अनियमितता; शहर विकास आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

चौकशी करून कारवाई करण्याची शिष्टमंडळाची मागणी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा/देऊळगाव राजा:देऊळगाव राजा नगर परिषदेमधील कथित अनियमितता, पक्षपाती कारभार, निविदा प्रक्रियेतील गैरप्रकार आणि लोकप्रतिनिधींना माहिती न देणे या गंभीर मुद्द्यांवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या सर्व प्रकारांची चौकशी करण्याची मागणी करत शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजनाताई अनिल रामाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि मनुष्यबळ सेवा पुरवठा निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर कथित अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही प्रक्रिया संशयास्पद असून यामध्ये नियमांना बगल देण्यात आल्याचे आघाडीचे म्हणणे आहे.

नगरसेवकांना डावलल्याची तक्रार

प्रशासकीय कारभारावर बोट ठेवताना, सर्वसाधारण सभेतील महत्त्वाचे विषय जाणीवपूर्वक अजेंड्यावर न घेणे, विरोधी नगरसेवकांना पालिकेच्या अधिकृत शासकीय कार्यक्रमांतून डावलणे आणि आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून न देणे, असे आरोप निवेदनातून करण्यात आले आहेत. हा प्रकार ‘महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगर अधिनियमा’तील तरतुदींचे थेट उल्लंघन करणारा असल्याचा दावाही शिष्टमंडळाने केला आहे.

कायद्यानुसार कारवाईची मागणीया

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर विकास आघाडीने केली आहे. या शिष्टमंडळात आघाडीच्या गटनेत्या रंजनाताई रामाने यांच्यासह शहर विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यावेळी, नगरसेवक कोटकर काशीफ खान, नगरसेविका दिशाताई खांडेभराड, नगरसेवक शिवाजी मेहत्रे, शेख अन्वर, नगरसेविका शितलताई खराट, विद्याताई कासारे तसेच ॲड. रामेश्वर रामाने आदी उपस्थित होते.आता या तक्रारीवर जिल्हाधिकारी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण देऊळगाव राजा शहराचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button