बुलढाणामहाराष्ट्र

आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने तेल्हारा शहरात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा ! शहिदांना श्रद्धांजली , वीर पत्नी व युद्धातील माजी सैनिकाचा संघटनेच्या वतीने सन्मान! विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

तेल्हारा |
तेल्हारा शहरात भागवत मंगल कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि.२६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवस तेल्हारा तालुका आजी-माजी सैनिक संघटने च्या वतीने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात तेल्हारा विश्रामगृहापासून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान , येथे भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच
शहीद स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वीर पत्नीकडून हारार्पण करण्यात आले .
श्री अनंतराव भागवत मंगल कार्यालय येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले .यामध्ये सर्व आजी-माजी सैनिक परिवार ,सामाजिक राजकीय पदाधिकारी , शिक्षक वृंद , विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंचकावर कारगिल युद्धातील शहीद बाजीराव रौंदळ यांच्या धर्मपत्नी कल्पनाताई बाजीराव रोड राहणार नाशिक व शहीद भानुदास बेडिसकर यांच्या धर्मपत्नी सरला ताई भानुदास बेडीसकार आणि १९६५ व १९७१ युद्धातील जवान लालाजी देशमुख , पी.एस.आय. कापसे साहेब पोलीस स्टेशन तेल्हारा , स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ प्राचार्य सौ.भागवत मॅडम, गुरुकुल ज्ञानपीठ प्राचार्य सौ. पारस्कर मॅडम व आजी-माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण बोदळे उपस्थित
होते.
याप्रसंगी श्री पाटील सर विद्यार्थी भावेश धर्मेश चौधरी , श्री विकास पवार यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमात कु.दातकर ,कु.बोदळे ,कु. दुगाने यांनी उत्कृष्ट देशभक्तीपर गीत गायन केले .सौ. भागवत मॅडम सौ.पारसकर मॅडम , श्री. गजानन पाथ्रीकर सर यांनी आपले विचार व्यक्त केले ,यावेळी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ , सेठ बन्सीधर विद्यालय ,श्री. शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रम च्या यशस्वीते करता सर्व आजी-माजी सैनिक परिवार व विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले . याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित सर्वांकरिता उत्कृष्ट स्नेहभोजनाची व्यवस्था आजी- माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर व आभार प्रदर्शन माजी सैनिक दिनेश माकोडे यांनी केले, व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button