बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

लोणार आणि मेहकरला जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के, बुलढाणा जिल्हा प्रशासनाने केले हे .आवाहन….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :-प्रशांत चव्हाण

बुलढाणा:- दि.०९/०७/२६ रोजी सकाळी हिंगोली ,नांदेड , व परभणी जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले , बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ,लोणार तालुक्यातील काही भागांमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान अधिकृत नोंदणीनुसार भूकंपाच्या चार धक्क्याची तीव्रता अनुक्रमे.१ ४ ३ ६ ३ ९ ४ १ रजिस्टर इतकी होती. भूकंपाच्या केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे आहे असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पहिला धक्का १ वाजून ३७ मिनिटांनी, दुसरा धक्का २ वाजून १५ मिनिटांनी, तिसरा धक्का २ वाजून १७ मिनिटांनी, तर चौथा धक्का ३ वाजून 37 मिनिटांनी जाणवला,
या भूकंपात प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी वित्तहानीची नोंद नाही. यासंदर्भात बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार यांनी सांगितले की. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे आहे,
लोणार आणि मेहकर तालुक्यातील काही भागात या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची शंका नाकारता येत नाही असे ते म्हणाले. नागरिकांनी भूकंपाचे धक्के बसत असताना पटकन मोकळ्या जागी जावे विशेषत: कच्चे बांधकाम असलेल्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता शासनाने दिलेली अधिकृत माहिती व सूचनांचीच नोंद घ्यावी. असेही ते म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही आपत्ती संदर्भात माहिती देण्यासाठी ७०२०४३५९५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button