पुणे-शेगांव बसचा जालना-चिखली मार्गावर अपघातएकाचा मृत्यू; २० जण जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव :- जालना चिखली मार्गावर काल पहाटे ५ वा.च्या सुमारास ओव्हरटेकच्या नादात शेगावला येत होती. समोरील ट्रकला पुणे-शेगाव बस क्र. एमएच १४-एलबी ०५४४ ने धडक देवुन अपघात झाला. यात एक प्रवाशी ठार झाला तर २० जण जखमी झाले. अंढेरा नजीक राम नगर फाट्यावर हा अपघात घडली. यापैकी दोघे गंभीर आहेत. सर्व जखमींना चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही बस पुण्यावरून
रामनगर फाट्याजवळ साखरेचे पोते भरलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव बसने ट्रकच्या मागच्या बाजूला धडक दिली. सदर ट्रक अचानक लेन सोडूनन आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला आहे. तर एसटी बस चालक एम.पी. हागुडे यांचे दोन्ही
पायांना गंभीर इजा झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोस्टेचे ठाणेदार विकास पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले.



