मुक्ताईनगर शहरातील पीडब्ल्यूडीचा भोंगळ कारभार –

आयते झाड आणलेलेले एकाच वर्षात लावलेली झाडे पडली आडवीनागरिकांमध्ये संतापाची भावना; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड, दोन नद्यांचा संगम असून देखील शहरात ही परिस्थिती झाडाला पाणी द्यायचा आळशी पणा की हेतू पुरस्कर करत आहे प्रशासन ?
मुक्ताईनगर – शहरातील प्रवर्तन चौक ते जुने गाव या मुख्य रस्त्याचे सौंदर्यीकरण एक ते दीड वर्षांपूर्वी करण्यात आले होते. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईसह झाडांचेही वृक्षारोपण करण्यात आले होते. दिवाळीच्या सुमारास मोठ्या खर्चातून हे काम करण्यात आले असले तरी सध्या या झाडांची दयनीय अवस्था झालेली आहे. आधीच झाडें ही मोठी आयते आणले असून झाडें काय महिना दोन महिन्या साठी लावले होते कां ?
उन्हाच्या तीव्रतेने वाढ झाल्यानंतर झाडांकडे कोणतेही लक्ष दिले गेले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. परिणामी, अनेक झाडे कंबरडे मोडून उलटी पडलेली आहेत, काही तर सुकून गेली आहेत. या स्थितीमुळे रस्त्याच्या सौंदर्याला गालबोट लागले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जुने गाव परिसरातील रहिवाशांनी यावर संताप व्यक्त करत, संबंधित प्रशासन आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) ठेकेदाराला दिले गेले असल्याची माहिती असून, शासनाने खर्च केलेल्या निधीचा योग्य उपयोग न झाल्याचे यावरून दिसून येते.
नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की, झाडांची त्वरित देखभाल करून शहराचे सौंदर्य व पर्यावरण रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे
आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर शहराची कायापालट करताना दिसून येत आहे सर्व मुक्ताईनगर शहरा मध्ये विकास कामांची गंगा चं वाहून आणली आहे आमदार शहराच्या विकासासाठी चांगले काम आहे. चांगले काम करण्याची देखील प्रशासनाची किंवा ठेकेदाराची इच्छा नसावी का आमदार साहेब लागेल तो निधी आणत आहे मुक्ताईनगर शहर हे खूप सुंदर शहर व्हायला हवे असे आमदारांचे स्वप्न आहे परंतु अशा प्रशासनामुळे व ठेकेदारांमुळे आमदार साहेबांची निराशा होईल का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात असून चर्चा केली जात आहे
यासंदर्भात पीडब्ल्यूडी चे अधिकारी बेंडकुळे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ?



