माळेगाव बाजार येथील साध्वी चंफा माता यात्रा महोत्सव उत्साहात होत आहे साजरा! अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सहावा दिवस ! विजय म घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

माळेगाव बा. (अकोला) :- तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे साध्वी चंफा माता यात्रा महोत्सव सुरू असून यात्रेनिमित्त माळेगाव बाजार येथे मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . आज अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस आहे. तेल्हारा शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन साध्वी चंफा माता संस्थान व माळेगाव बाजार येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा महोत्सव मंगळवार दि.६ मे पासून सुरू झाला असून दि.१३ मे रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे.
या दरम्यान आयोजित केलेले विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत.
दैनंदिन कार्यक्रमाध्ये , सायंकाळी ५ ते ६ काकड आरती, सकाळी ९ ते १२ व ३ ते ६ भव्य भागवत कथा वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८ ते ११ हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कथा, ह.भ.प. श्री प्रमोद महाराज राहणे ( पळशी-झाशी) यांचे प्रवचन, तसेच सप्ताह दरम्यान रोज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी कीर्तनाचे कार्यक्रम पार पडत आहे. दि.६ मे रोजी ह.भ .प. एकनाथ महाराज चोपडे, खामगाव दि.७ मे रोजी ह.भ.प. पंकज महाराज पवार, कारंजा दि. ८ मे रोजी ह.भ.प.अरुण महाराज लांडे, पारस दि.९ मे रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे, दि.१० मे रोजी ह.भ.प. हरी महाराज राशीतकर अकोला आदिंचे कार्यक्रम माळेगाव येथे आजपर्यंत उत्साहात पार पडले असुन आज दिनांक ११ मे रोजी पंढरपूर येथील ह.भ.प. ज्योती धनाडे, यांचे तसेच दि. १२ मे रोजी ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुर यांचे कीर्तन होणार आहे व दि. १३ मे रोजी सकाळी ह.भ.प. प्रमोद महाराज राहणे यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर साध्वी चंफा मातेचा भव्य -दिव्य असा दिंडी सोहळा माळेगाव नगरीत पार पडणार असून सायंकाळी भव्य महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार या यात्रा महोत्सवा करिता परंपरेनुसार गावातील लेकी-बाई आवर्जून उपस्थित राहत असतात. तरी परिसरातील नागरिकांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळेगाव बाजार येथील गावकरी तसेच मंदिर समिती च्या वतीने करण्यात आले आहे . या ठिकाणी परगावातून आलेल्या भाविकांसाठी सकाळ व संध्याकाळ सर्व प्रकारची जेवणाची व राहण्याची व्यवस्था साध्वी चंफा माता संस्थान व गावकरी मंडळींकडून करण्यात आलेली आहे.



