महाराष्ट्रविदर्भ

दारूची विक्री करतांना एकास पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव । येथील तीन पुतळे परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री करित असताना पोलिसांनी एकास पकडून त्याचेविरूध्द महाराष्ट्र दारू कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही घटना आज १६ सप्टेंबर रोजी ११.४५ वाजता सुमारास घडली.

खबऱ्याच्या माहितीवरून आज सकाळी ११.४५ वाजता सुमारास पोहेकॉ गजानन वाघमारे, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गव्हांदे यांनी पंचासह तिन पुतळे परिसरात जावून आरोपी प्रशांत प्रल्हाद शेगोकार (२५) रा. भीमनगर तिनपुतळे परिसर शेगाव याची संशयावरून झडती घेतली असता त्याचेजवळ एका थैलीत विना परवाना देशी दारू टँगो पंच कंपनीच्या ९० एमएलच्या १७ नग शिश्या मिळून आल्या. पोलिसांनी त्याचेजवळचा एकूण ६०५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व त्याचे विरूध्द ६५ ई मदाकानुसार गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button