बुलढाणाविदर्भ

आवास योजनेचा लाभ मिळण्याची का? मागणी

आवास योजनेचा लाभ मिळण्याची मागणी
(प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
वरवट बकाल येथील रहिवासी दादाराव सत्तू इंगळे यांनी नियामानुकूल आवास योजनेचा लाभ मिळण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांच्याकडे वडिलोपार्जित जागा नसल्याने मागील १८ ते २० वर्षापासून गावालगत असलेल्या गट क्रमांक २८८ या शासनाच्या १९९५ वाढीव गावठाण आरक्षित जागेत अतिक्रमण करून कुडा-मातीच्या झोपडीत कुटुंबासह राहत आहेत. त्यातच दिव्यांग असल्याने श्रम करून उपजीविका करता येत नाही. त्यांची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या अधिनियमानुसार नियामानुकूल या विषयाशी अनुसरून ग्रामपंचायतने शासनाच्या प्रदत्त पाठपुरावा केला. समितीकडे

वरवट बकाल येथे आयोजित महाराजस्व अभियान शिबिरात

समितीने कुठलीच दखल घेतली नाही. त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत गेल्या ६-७ वर्षांपासून जागेअभावी लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मागणीची येत्या आठवड्यात दखल न झाल्यास कुटुंबासह समितीच्या कार्यालयापुढे परिवारासह संपवून घेण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button