खानदेशजळगावा जिल्हा

मुक्ताईनगर येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप झांबरे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनियार बिरादरीच्या वतीने त्यांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.”

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)मुक्ताईनगर येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप झांबरे यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल अलीकडेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या गौरवाच्या निमित्ताने आज मनियार बिरादरीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्री. प्रदीप झांबरे यांचा शाल,व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्कार करते वेळी जळगांव जिल्हा मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी,मनियार मस्जिद चे मुत्वल्ली कलीम मनियार, खजिनदार अहमद ठेकेदार, अब्दुल रफीक शेख, अल्ताफ सर, आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button