रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी विजय गोपाल चौधरी, तर सचिवपदी प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी यांची निवड
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी : विकास आमोदकर
रावेर : रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा दत्तगुरु लॉन्स, रावेर येथे उत्साहात पार पडली. या सभेत आगामी कार्यकाळासाठी असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सचिव अनिल भाऊ झवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विजय गोपाल चौधरी (त्रिमूर्ती मेडिकल), उपाध्यक्षपदी सर्वेश किशोर लोमटे (श्रीहरी मेडिकल, सावदा), सचिवपदी प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी (कोमल मेडिकल), तर खजिनदारपदी निलेश यादव महाजन (साई श्रद्धा मेडिकल) यांची निवड झाली.
तसेच सहसचिवपदी पवन किशोर पाटील (सूर्या मेडिकल) व अंशुल ज्ञानेश्वर महाजन (ज्ञानछाया डिस्ट्रिब्युटर) यांची, तर सोशल मीडिया प्रमुखपदी संकेत पाटील (संकेत फार्मा अँड मेडिकल) यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज महाजन, प्रमोद महाजन, रुपेश चौधरी, निकीत परदेशी, भरत येवले, अंकुश महाजन, ललित पाटील आणि मुदस्सिर शेख यांची निवड करण्यात आली.
यावेळी रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंद महाजन, माजी उपाध्यक्ष गुणवंत भंगाळे, माजी सचिव प्रवीण सरोदे, माजी खजिनदार लखन सावळे, माजी अध्यक्ष संजय चौधरी, दीपक लोमटे यांच्यासह माजी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवनिर्वाचित कार्यकारिणीला आगामी कार्यकाळासाठी दिशा मिळाली.
सभेला रावेर तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयएमए रावेर तालुका अध्यक्ष डॉ. संदीप पाटील व दीपक नगरे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्यासोबतच व्यावसायिकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा विश्वास नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला.



