Uncategorized

जळगाव येथील तरुणाची मुक्ताईनगर तालुक्यात हत्या करून मृतदेह फेकला पूर्णा नदीपात्रात तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे

सविस्तर वृत्त असे की मयत नितीन पाटील चा भाऊ सचिन साहेबराव पाटील राहणार आसोदा रेल्वे गेट जवळ जळगाव यांनी समक्ष पोलीस स्टेशनला येऊन कळविले की त्याचा भाऊ नितीन साहेबराव पाटील वय 26 हा त्याचा मित्र वैभव गोकुळ कोळी राहणार आसोदा रेल्वे गेट जवळ जळगाव हे दोघेही सोबत डोलारखेडा फाटा येथे उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी आलेले होते त्या ठिकाणी वैभव गोकुळ कोळी आणि संतोष भागवत कठोरे राहणार बोदवड तालुका मुक्ताईनगर यांनी मिळून उसनवार पैशाच्या वादातून नितीन पाटील यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून त्याचा खून केला आहे आणि त्याचे प्रेत पूर्णा नदीच्या पात्रात टाकून दिले आहे अशी माहिती मिळताच वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे संशयित आरोपी आणि मयताचा प्रेताचा शोध सुरू करण्यात आला नितीन पाटील याचे प्रेताचा बोटी आणि पाणबुड्याच्या सहाय्याने पूर्णा नदी पात्रात शोध घेतला असता प्रेत मिळून आले आहे आरोपी वैभव कोळी आणि संतोष कठोरे दोन्ही राहणार बोदवड( कुऱ्हा) यांना तात्काळ अटक करण्यात आलेले आहे सदरचा गुन्हा हा मा. डॉक्टर महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधीक्षक जळगाव मां. श्री अशोक नखाते सो, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर विभाग यांचे मार्गदर्शन आणि सूचनानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे ,पोलीस हवालदार लीलाधर भाई ,राजकुमार चव्हाण, पोलीस नाईक मोतीलाल बोरसे, विजय पडार, प्रदीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कोळी, प्रशांत चौधरी, रवींद्र धनगर, सागर साळवे, अनिल देवरे ,प्रदीप देशमुख, विशाल पवार ,ईश्वर पाटील, चालक सहाय्यक फौजदार शेख यांनी केलेला आहे आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button